Indian Cyclists Network

ई-सायकलचा अभिनव प्रयोग

ई-सायकलचा अभिनव प्रयो
आपल्या या ई-सायकलवरून खेळायला किंवा फिरायला निघालेला तनय सध्या सर्वाच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.


ई-सायकलचा अभिनव प्रयोग
रमणबाग प्रशालेत नववीत शिकणाऱ्या तनय बुधाटीने आपल्या जुन्या सायकलचे ई-सायकलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

नववीत शिकणाऱ्या तनयच्या प्रयोगाला यश ; जुन्या सायकलचा केला कायापालट

: वार्षिक परीक्षा संपवून उन्हाळय़ाची सुट्टी सुरू झाली की वर्षभर करायला न मिळालेल्या गोष्टी करून बघायचे वेध बच्चेकंपनीला लागतात. त्यातच असा प्रयोग त्यांच्या आवडीचा असेल तर त्यांचा उत्साहही दुणावतो.

रमणबाग प्रशालेत यंदा नववीत गेलेल्या तनय बुधाटीने असाच एक अभिनव प्रयोग करून त्याच्या जुन्या सायकलला नवीन ई-सायकलमध्ये रूपांतरित केले आहे.

आपल्या या ई-सायकलवरून खेळायला किंवा फिरायला निघालेला तनय सध्या सर्वाच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

तनय सांगतो, घरात आणि शाळेत सतत प्रदूषण या समस्येवर बोलले जाते. प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधायचा असेल तर प्रत्येकाने काहीतरी करायला हवे असेही सांगितले जाते. यूटय़ूबवर विज्ञान, वैज्ञानिक प्रयोग यांचे व्हिडिओ बघण्याची मला आवड आहे. असेच व्हिडिओ बघत असताना परदेशात कोणीतरी आपल्या जुन्या सायकलची ई-सायकल कशी बनवली याचा व्हिडिओ मी पाहिला आणि यंदाच्या उन्हाळय़ाच्या सुट्टीत माझी सायकल ई-सायकल करायची असे मी ठरवले.

तनय म्हणाला, ई-सायकल बनवण्यासाठी बॅटरी, मोटार, कंट्रोलर, वायरिंग अशा आवश्यक वस्तूंची यादी तयार केली. या वस्तू आणल्यानंतर मी १५ दिवस रोज ई-सायकल तयार करण्यासाठी धडपड करत होतो, कधी काम जमत होते तर कधी काहीच जमत नव्हते. त्या वेळी माझे आजोबा माझ्या मदतीला आले.

सायकलचे वायरिंग बदलणे, मोटार बसवणे, चेन बदलणे, फ्लायव्हील लावणे अशा गोष्टींमध्ये आजोबा मदत करत होते. हातात घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही या त्यांच्या सांगण्यामुळेच मी हे काम पूर्ण करू शकलो.


तनयची आई संगीता बुधाटी सांगतात, शाळेतील विज्ञान प्रकल्पांसाठी स्वत: अभ्यास करून काहीतरी प्रयोग करायचा ही तनयची आवड आहे.

वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी बादलीला सेन्सर बसवण्याचा प्रयोगही त्याने याआधी केला होता. ई-सायकलसाठी तनयचे आजोबा यशवंत कान्हेरे आणि त्याचे रेल्वेमध्ये काम करणारे वडील अंजनेयुलू यांचे तनयला मार्गदर्शन झाले.

अशी आहे ई-सायकल
तनयच्या तयार झालेल्या ई-सायकलचा वेग अंदाजे ४० किलोमीटर प्रतितास एवढा आहे. सायकलला १२ व्होल्टच्या दोन बॅटरी, २५० एचपी क्षमतेची मोटार आणि एक्सलेटर बसवले आहे. दुचाकी वाहनांना असतो तसा हेडलाईट आणि इंडिकेटरदेखील बसवण्यात आले आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर सायकल अंदाजे ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करू शकते. बॅटरी संपली तर पायडल मारूनसुद्धा ती चालवता येते.

Views: 127

Comment

You need to be a member of Indian Cyclists Network to add comments!

Join Indian Cyclists Network

Photos

  • Add Photos
  • View All

Badge

Loading…

© 2019   Created by Amit Bhowmik.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service