Indian Cyclists Network

श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे पुण्यातील सहा जैन युवक सायकलवरून रवाना             पुणे व परिसरातील सहा जैन युवक सकाळी5.30 वाजता सायकल वरून जैन धर्मियांचे झारखंड येथील तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र सम्मेद …

श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे

पुण्यातील सहा जैन युवक सायकलवरून रवाना

            पुणे व परिसरातील सहा जैन युवक सकाळी5.30 वाजता सायकल वरून जैन धर्मियांचे झारखंड येथील तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे रवाना झाले. निगडी येथील जैन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी सायकल यात्रेस प्रारंभ केला. प्रकाश शेडबाळे, सुदीन खोत, धनंजय शेडबाळे, संजय नाईक, धनंजय चिंचवाडे आणि अजित पाटील या सहा तरूणांनी ‘सद्भावना पर्यावरण सायकल यात्रे’चे आयोजन केले असून सुमारे2100 किलोमीटरचा सायकल प्रवास करून हे तरूण दिनांक 1 फेब्रुवारी रोजी झारखंड येथील मधुबन - श्री सम्मेद शिखरजी येथे पोहचतील. पुणे येथून निघून अहमदनगर, औरंगाबाद, लोनार, कारंजा, वर्धा, भंडारा,राजनंदनगाव, पाटेवा, बारगड, सुंदरगड, गुमला, गोला आणि मधुबन (श्री सम्मेद शिखरजी) असा त्यांचा प्रवास असणार आहे. रोज सुमारे 150 किलोमीटर सायकल प्रवास करण्याची त्यांची योजना आहे. वाटेत प्रवासात ग्रामस्थांना जांभूळ व पेरूची रोपे ते देणार असून सर्व धर्मिय सद्भावना व अहिंसा यासाठी प्रार्थनाही करणार आहेत. पुणे व परिसरात दिगंबर जैन मुनिश्री पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास आयोजित करणार्‍या सकल जैन वर्षायोग समितीचे हे तरूण सदस्य आहेत. मागील वर्षी त्यांनी पुणे ते श्रवणबेळगोळ (कर्नाटक) अशी सायकल यात्रा केली होती.

            पुणे ते मधुबन (श्री सम्मेद शिखरजी - झारखंड) असा सायकल प्रवास करणार्‍या या सहा तरूणांना आदल्या दिवशी मॉडेल कॉलनीतील एचएनडी जैन बोर्डिंग येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा धर्मानुरागी शोभा धारीवाल यांच्या शुभहस्ते हा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी जैन सहयोगचे अध्यक्ष व सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘या सर्व तरूणांनी आपला व्यवसाय व संसार सांभाळत जैन तिर्थक्षेत्रांना सायकलवरून जाण्याचा केलेला हा संकल्प अनुकरणीय आहे.’ असे ते म्हणाले.

            याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देताना शोभा धारिवाल म्हणाल्या की, सर्व सुखसोयी उपलब्ध असताना ही सायकल वरून जैन तिर्थक्षेत्रांकडे जाण्याचा या तरूणांचा हा संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. याबरोबरच सद्भावना आणि पर्यावरण याचा संदेशही ते प्रवासात देणार आहेत ही आनंदाची बाब आहे. धर्मश्रद्धा आणि साहस याचा आदर्श मिलाफ असणार्‍या या सायकल यात्रेपासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

            या प्रसंगी सुजाता शहा, जितेंद्र शहा, अतुल शहा,विरकुमार शहा, सुरेंद्र गांधी, डॉ. कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते. तसेच एचएनडी जैन बोर्डिंगचे सुमारे 100विद्यार्थी उपस्थित होते.

 

फोटो : Cycle yatra

फोटो ओळ :

  1. पुण्यातील निगडी जैन मंदीर येथून सहा तरूणांनी मधुबन - श्री सम्मेद शिखरजी (झारखंड) येथ पर्यंत सद्भावना पर्यावरण सायकल यात्रेसप्रारंभ केला. त्यांना धर्मानुरागी शोभा धारिवाल यांच्या हस्ते निरोप देण्यात आला. सोबत जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे.

Views: 124

Comment

You need to be a member of Indian Cyclists Network to add comments!

Join Indian Cyclists Network

Photos

  • Add Photos
  • View All

Badge

Loading…

© 2020   Created by Amit Bhowmik.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service